Tuesday, November 25, 2014

संत आणि ज्योतिषी

प्रसंग पहिला: तरुण भारत वर्तमान पत्रातील बातमी ( बहुधा सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०१४)
ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी आज फादर कुरिअकोसे ऊर्फ चावारा आणि सिस्टर युफ्रेशिया इलुवेंथिकल यांना व्हॅटिकन येथे संतपद बहाल केल्याचे जाहीर केले.

प्रसंग दुसरा: तरुण भारत वर्तमान पत्रातील बातमी ( मंगळवार दि. २५ नोव्हेंबर २०१४)
शिक्षा मंत्री स्मृती इराणी ह्या ज्योतिषाला भेटल्या.
 फादर कुरिअकोसे ऊर्फ चावारा आणि सिस्टर युफ्रेशिया इलुवेंथिकलदोघेही मूळ केरळमधील आहेत. एका विशेष सत्रावेळी पोप यांनी ही घोषणा केल्याचे केरळमधील पुरातन सायरो मलबार कॅथोलिक चर्चने सांगितले आहे. या दोघांना संतपद मिळाल्यामुळे सायरो मलबार कॅथोलिक चर्चला तीन संतपदे मिळाली आहेत. 2008 मध्येही सिस्टर अल्फोन्सा यांना रेव्हरंड पद देण्यात आले होते.  ज्यांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केला असेल आणि ते चमत्कार "सिद्ध" झाले असतील तरच अश्या ख्रिस्ती  लोकांना अशे संतपदे बहाल करता येऊ शकतात. (संदर्भ: http://en.wikipedia.org/wiki/Canonization) सर्वत्र प्रसार माध्यमांनी ह्या संतपद देण्याने भारताचे नाव संपूर्ण विश्वात कसे कीर्तिमान(?) झाले आहे ह्याचे यथायोग्य (?) वर्णन केलेले आपण बघितले आणि वाचले आहेच.
लगोलग दुसर्याच दिवशी स्मृती इरणिंनि ज्योतिषाला हात दाखवून (अवलक्षण ) अंधाश्रध्देला खतपाणी घातल्याची बोंबाबोंब सुद्धा प्रसारमाध्यमांनी गाजावाजा करत केलेली बघण्यात आली. भारतातील तमाम सेक्युलर मंडळी इराणींवर अक्षरश: तुटून पडल्याची तेव्हा बघायला मिळाली. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा  गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या सुद्द्धा वारंवार ज्योतिषांना भेटत असत. नरसिम्हराव पंतप्रधान असताना त्यांचा आणि तांत्रिक चंद्रास्वामी ह्यांचा उघड उघड संबंध असलेला सुद्धा आम्ही बघितला आहे. इंदिरा  गांधी आणि नरसिम्हराव यांच्या कालावधीत आम्ही तसे वयानी होतो. आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले सुद्धा नुकतेच आम्हाला कळू लागले होते. हे काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक काम करीत असतील असा आमचा तेव्हा आमचा (गैर) समज होता. आणि ह्या लोकांबद्दल प्रचंड कुतूहल आम्हा मित्र मंडळीत असे. पुढे पुढे वाढत्या वयाबरोबर  खरी मेख समजू लागली ती गोष्ट वेगळी.

तथाकथित पुरोगामी आणि हिंदू बुवाबाजीवर बोलणारे अंधश्रद्धा निर्मुलन वाले (अंनिस) आतातरी   आपले तोंड उघडून पहिल्या घटनेबद्दल जाहीररित्या आपले वैज्ञानिक म्हणणे संपूर्ण समाजास सांगतील अशी अपेक्षा आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यास हे सार्वजनिक आवाहन आहे की त्यांनी चर्चच्या ह्या अंधश्रद्ध चालीबद्दल उघड विरोध करून दाखवावा. अंनिस आता आपण चर्चला खुले आव्हान देणार ना? मुह गिळू गप्प राहणे आता चालणार नाही, ह्या अन्धश्रध्द लोकांचे कारनामे समोर आलेच पाहिजेत. अंनिस खुल्या मनाने हे आव्हान स्वीकारतील अशी माफक अपेक्षा आहे. द्याल न साथ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या महान कार्यासाठी?